उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा






🌞 प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त 🌞

🏆तालुका स्तरीय अभिवादन प्रश्नोत्तरे स्पर्धा 🏆

या स्पर्धेचा वाढता प्रतिसाद बघता आम्ही काही बदल केले आहे. ते खालीलप्रमाणे
  • 1. स्पर्धेचे बक्षीस दोन्ही गटासाठी अनुक्रमाणे 5125 रु, 3125 रु व 2125 रुपये.

  • 2. वस्तुनिष्ठ स्वरुपाचे 125 प्रश्न व 125 मिनिटे वेळ.

  • 3. परीक्षा दिनांक 10/04/2016 व वेळ 11 ते 01:05 वाजेपर्यंत.

  • 4. परीक्षेसाठी दोन केंद्र देवराव दादा हायस्कूल व कृष्णबाई दंडाळे विद्यालय

  • 5. डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्न.

  • 6. बक्षीस वितरण दिनांक 15/04/16

  • 7. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र

  • 8. प्रोत्साहन पर अनेक बक्षीसे व ट्रॉफी

  • 9. परीक्षा फी नाममात्र 20 रुपये.

  • 10. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 05/04/2016


सर्व मुख्याध्यापकांना विनंती की, त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रेरीत करावे.

आज परीक्षेच्या स्वरुपाविषयीचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज आपल्या पर्यंत पोहचविले जाईल.

प्रफुल बनसोड (सचिव )
फिनिक्स संघटना तिवसा



विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या. अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा परीक्षेच्या '' अ '' आणि '' ब '' गटाच्या प्रश्नपत्रिका आपणासाठी अवलोकनासाठी ठेवत आहे. त्या तुम्ही डाऊनलोड सुध्दा करु शकता.


                 डाऊनलोड शब्दाला क्लिक करा.
            


          प्रश्नपत्रिका   'अ'  गटासाठी  -    डाऊनलोड

          प्रश्नपत्रिका   'ब'  गटासाठी  -    डाऊनलोड






 वरील प्रश्नपत्रिकेची उत्तरसुची ( Answer Key ) खालिल प्रमाणे आहे. आपण ही उत्तरसुची डाऊनलोड करुन घ्यावी.

Answer Key for Group A - DOWNLOAD

         Answer Key for Group B    DOWNLOAD         

आपल्या प्रतिक्रिया पाठवा.             

No comments:

Post a Comment