उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

विद्यार्थ्यांकरिता योजना

विद्यार्थ्यांकरिता योजना


 1 उपस्थिती भत्ता - ही योजना ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुलींकरिता आहे.

2 मोफत गणवेश योजना -ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
3 मोफत लेखन साहित्य -ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
4 शालेय पोषण आहार - ई .  ई . १ली ते ८ वी मधील उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
5 मोफत पाठ्यपुस्तके - ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
6 मोफत गणवेश योजना  -ई . १ली ते ८ वी सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
7 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती - इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
8 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती - इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली
9 माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती- ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली
10 परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
11 अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी १) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
12 अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  -ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
13 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती  -११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
16 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती - १०वी व १२ वी १०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
17 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता -५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
18 मोफत गणवेश योजना -१ली ते ४ थी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
19 अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई. -१ली ते १० वी मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३) साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
20 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी १) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक
राजीव गांधी विद्यार्थी अपघात आनुग्रह अनुदान योजना :-
शासन निर्णया क्रमांक पीआरई २०११/प्र.क्र.२४९/प्राशि-१, दि. ११ जुलै २०११ नुसार २७ ऑगस्ट २०१० पासून घडलेल्या घटनांना लाभ देवू शकतो. ज्या द्यार्थ्यांस कायम अपंगत्व व मृत्यू झाला असल्यास या योजनेतून लाभ देवू शकतो. एक अवयव निकामी रु. ३००००/- दोन अवयव निकामी रु.५००००/- व मृत्यू झाल्यास रु.७५०००/- इतका भरपाई देवू शकतो.
अल्पसंख्याक मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजना :-
शासन निर्णय क्र.प्रपंका २००९ (८९/०९) असंस दि. ३० जून २००९ नुसार अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. केंद्र शासनाने जाहिर केल्याप्रमाणे मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारसी या समाजातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होतो. मंजूर शिष्यवृत्तीधारकास वार्षिक रु.१०००/-इतकी रक्कम दिली जाते.
अल्पसंख्याक उपस्थिती भत्ता / प्रोत्साहनपर भत्ता योजना :-
शासन निर्णय क्र.असंस-२००९ प्र.क्र३७/कार्या-१, दि. ५ फेब्रुवारी २००९ नुसार अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासन मान्य वरिष्ठ प्राथमिक शाळेतील इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक (मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन व पारसी) समाजातील विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी व उपस्थितींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून शासन मान्य सर्व शासकीय तसेच खाजगी अनुदानित, विनाअनुदानित (कायम विना अनुदानित शाळा वगळून) इ. ५ वी ते ७ वी मध्ये नियमित उपस्थित राहणार्याय विद्यार्थ्यांच्या पालकांना रु.२/- प्रति दिवस देण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. सदरहू विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ७५% पेक्षा जास्त उपस्थिती असणे आवश्यक आहे. सदरहू प्रोत्साहन भत्ता जास्तीत जास्त २२० दिवसासाठी देय राहील.
अल्पसंख्याक गणवेष वाटप योजना :-
शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभाग क्र.असंस/२००९/प्र.क्र.३६/का-१, दि. २४/०२/२००९ नुसार शासन मान्य प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व शासकी / खाजगी अनुदानित व विनाअनुदानित (कायम विना अनुदानित शाळा वगळून) प्राथमिक शाळेतील अल्पसंख्याक समाजातील (मुस्मील, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन व पारसी) समाजातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करणेकामी प्रति विद्यार्थी रु.२००/- प्रमाणे मंजूरी दिलेली आहे.


No comments:

Post a Comment