उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

MDM APP अधिक माहिती



सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, ज्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो अशा शालेय पोषण आहाराच्या नोंदी सरल मध्ये ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या नोंदी आपणास 3 प्रकारे पुढील प्रकार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

🔺 सरल वेबसाइट च्या माध्यमातून

🔺 MDM मोबाइल application

🔺  SHORT TEXT MESSAGE(SMS)


2) सध्या सरल वेबसाइट च्या माध्यमातून शालेय पोषण आहाराच्या नोंदी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तसेच MDM मोबाइल application च्या माध्यमातून नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

3) सरल मधील school पोर्टल मध्ये MDM या प्रमुख tab ला क्लीक करुन आपण login करावयाचे आहे.login करत असताना id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर आणि पासवर्ड म्हणून school पोर्टल चा पासवर्ड हा MDM चा पासवर्ड असणार आहे याची नोंद घ्यावी.

4)लॉगिन केल्यावर आपणास 2 tab मध्ये काम करावयाचे आहे.

🔺  OPENING BALANCE

🔺  MDM Daily attendance


5) opening balance या tab मध्ये आपणास भरावयाची माहिती ही अतिषय महत्वाची असून ती या वर्षाच्या सुरवातीलाच एकदाच भरावयाची आहे.या मध्ये मागील शैक्षणिक वर्षाअखेरचा शिल्लक धान्य साठा भरावयाचा आहे.ही माहिती एकदा भरल्यावर यापुढे आपला शिल्लक साठा ऑटोजनरेट होणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.ही माहिती beo यांनी एकदा वेरीफाई केली की पुन्हा यात आपणास बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

6) जर मागील वर्षी आपला धान्य साठा संपलेला असेल आणि आपण सदर धान्य अथवा धान्यादी माल उसना घेतला असेल तर अशा बाबतीत आपण आपले शिल्लक धान्य मायनस मध्ये लिहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.

7) जर आपली शाळा प्राथमिक (1 ते 5) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.जर शाळा प्राथमिक असेल परंतु वर्ग मात्र 4 थी पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तरीही 1 ते 5 (primary) हा ऑप्शन select करावा आणि इयत्ता मध्ये आपल्याकडे असलेल्या इयत्ता select करुन घ्याव्या आणि माहिती भरावी.

8) जर आपली शाळा फक्त उच्चप्राथमिक (6 ते 8) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.अशा वेळी 1 ते 5 (प्राथमिक) हा ऑप्शन निवडु नये.

9)जर आपली शाळा ही प्राथमिक व उच्चप्राथमिक म्हणजे (1 ते 8 म्हणजे both) असेल अशा वेळी 1 ते 5 आणि 6 ते 8 म्हणजेच फक्त प्राथमिक आणि फक्त उच्च प्राथमिक हा ऑप्शन न निवडता 1 ते 8 हा ऑप्शन निवडावा आणि सर्व इयत्ता select कराव्या व पुढील माहिती भरावी.

10) धान्याची नोंद घेताना कि.ग्रॅ या एककामध्ये भरवायाचे आहे.उदा., आपनाकडे धान्य हे साडे सात किलो एवढे शिल्लक असेल तर ते आपण ते 7.500 असे लिहावे.दशांश चिन्हानंतर 3 डिजिट लिहिन्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.याची नोंद घ्यावी.

11)opening balance भरल्याशिवाय daily attendance ची माहिती आपणास भरता येणार नाही आहे.त्यामुळे आपण त्वरित ही माहिती भरून घ्यावी.

12)daily attendance भरत असताना इयत्तवार उपस्थित मुले (present student) भरावे आणि त्या खाली असलेल्या रकान्यात present मुलांपैकी किती मुलांना पोषण आहार दिला गेला आहे त्या मुलांची आकडेवारी लिहावयाची आहे.या रकान्यात किती धान्य दिले गेले हे लिहावयाचे नाही आहे हे लक्षात घ्यावे.

13) जरी आज आपण ही दोन्ही प्रकारची माहिती भरून पूर्ण केली नसेल तरी पुढील 2 दिवस ही माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.परंतु त्या नंतर मात्र रोजच्या रोजची माहिती रोज अपडेट करावयाची आहे.त्या वेळी आपणास मागील दिवसांची माहिती अपडेट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे आपणास दिलेल्या संधी चा लाभ घेऊन आपण ही माहिती भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विलंब करू नये अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.

 अत्यंत महत्वाचे :


14) कृपया लवकरात लवकर आपण सदर माहिती भरून पूर्ण करावी.

15) MDM मोबाइल application हे आपण रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवरच active होईल याची नोंद घ्यावी.त्यामुळे अद्याप आपण आपले मोबाइल नंबर रजिस्टर केले नसेल तर लवकरात लवकर रजिस्टर करुन घ्यावे.

16) MDM मोबाइल application हे तेव्हांच सुरु होईल जेव्हा आपण सरल वेबसाईट वरुन opening balance भराल.





No comments:

Post a Comment