मराठी मध्ये टायपींग करतांना आपल्याला काही आकर्षक फॉन्टची गरज असते. त्याच प्रमाणे आय. एस. एम. मधील एखादी फाईल जर आपण डाऊनलोड केली आणि आपल्याकडे आय. एस. एम.चे फॉन्ट नसतील तर ती फाईल दिसत नाही तेव्हा आपल्याला अडचण निर्माण होते. मग ती अडचण दूर करण्यासाठी आपण हे फॉन्ट डाऊनलोड करुन घ्या.
युनिकोड फॉन्ट म्हणजे जे जगातील कोणत्याही कंपुटरला दिसतील असे फॉन्ट (वाचता येतील) आणि महाराष्ट्र शासनाने ऑफिशीयल कामासाठी निर्माण केलेले आय.एस.एम. फॉन्ट जे फक्त ज्यांच्या कंपुटरला आय.एस.एम. सॉफ्टवेअर इंस्टाल आहे अशाच लोकांना दिसणारे.
चला तर मग आपणही कोणतीही फाईल वाचण्यास आपल्या कंपुटरला सक्षम बनवूया.......
प्रक्रिया - सुरवातीला खाली दिलेल्या बटनाला क्लिक करुन फॉन्ट डाऊनलोड करुन घ्या, आता तुमचे हे डाऊनलोड झालेले सर्व फॉन्ट कंपुटरच्या डाऊनलोड या फोल्डर मध्ये जमा होईल किंवा तुम्ही डाऊनलोडचा जो पाथ दिला असेल त्यात जमा होईल.
आता त्या फोल्डरला डबल क्लिक करुन ओपन करा. सर्व फॉन्ट कॉपी करुन घ्या. आता खालिल कृती करा.
Start --> setting --> control panel --> fonts --> paste
तुमचे सर्व फॉन्ट पेस्ट होतील.
खालिल बटनाला क्लिक करा आणि मराठी फॉन्ट डाऊनलोड करा.
प्रफुल्ल सर मस्त ब्लॉग
ReplyDeleteप्रफुल्ल सर मस्त ब्लॉग
ReplyDelete