उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Income Tax Return


 Income Tax Return ऑनलाईन कसा भरावा ? या बाबत आपल्या मनात अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेवूया.

   * या मध्ये वकिलाची आपल्याला गरज नाही.

           सर्व प्रथम आपण  incometaxindiaefilling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आपण पहिल्यांदाच रिटर्न भरत असाल तर आपण या साईटवर रजिट्रेशन      करुन घ्या. रजिट्रेशन करतेवेळी आपले पॅन कार्ड जवळ ठेवा.
  नंतर लॉगईन करा. पॅन नंबर हाँ आपला युझर आयडी असतो. या नंतर ड्रॉपडाउन टॅब मधून fill   e-return निवडा व आपला return भरा.

                     * या साईटवर आपले अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पंचायत विभागाने कधी टॅक्स भरला किंवा भरला नाही हे चटकन दिसते. कारण ही Income Tax ची official site आहे.

संपूर्ण माहिती करीता आपण  See Presentation या शब्दाला क्लिक करा.
  
                                      

 

मी भरलेला फॉर्म

फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा. प्रिंट काढून घ्या. नंतर डॅशबोर्ड या टॅबला क्लिक करुन हा फॉर्म लगेच व्हेरिफॉय करुन घ्या. जर हे शक्य नसेल तर काढलेल्या प्रिंटवर स्वतःची सही करुन साध्या डाकेने हा फॉर्म बंगलोर ऑफिसला पाठवा, पत्ता फॉर्मच्या खाली दिला असतो.
 
 हा फॉर्म भरतेवेळी मा. गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीची काहीच गरज पडत नाही. परंतू आपल्या रेकार्ड साठी त्यांची स्वाक्षरी यथावकाश घेता येईल.


 

No comments:

Post a Comment