उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८


सूचना

संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८
शासन निर्देशांप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ चाचणीचे आयोजन हे राज्यस्तरावरून करण्यात येणार नसल्याचे तथापि शाळांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ चाचणी त्यांच्या मूल्यमापनाच्या नियोजनाप्रमाणे शाळास्तरावर घेणेबाबत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत कळविण्यात आले होते.
तथापि महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून/ शाळांकडून संदर्भासाठी संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या प्रश्नपत्रिकांची मागणी सातत्याने केली जात आहे. यामुळे ज्या शाळांना राज्यस्तरावर तयार केलेल्या संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या प्रश्नपत्रिका संदर्भांसाठी वापरावयाच्या आहेत ते स्वेच्छेने www.maa.ac.in या वेबसाईटवरून सदर प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र डाऊनलोड करून वापरू शकतात.
संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८ चे गुण सरल मध्ये भरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
डॉ.सुनिल मगर
संचालक,
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे



एका क्लीकवर सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. खालील डाऊनलोड शब्दाला क्लीक करा.


                                              डाऊनलोड

No comments:

Post a Comment