उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Friday 3 April 2015

नमस्कार मित्रांनो !

                                            नमस्कार मित्रांनो !

   मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव येथे सहाय्यक शिक्षक या   पदावर कार्यरत आहे. मी बारा वर्ष मेळघाट या अतीदुर्गम भागात सेवा           दिली आहे. तंत्रज्ञानावरील शिक्षण आज अत्यंत आवश्यक असल्यामुळे         मी नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे.  रचनावादी पध्दतीने शिकण्यास वेळ लागतो पण मिळणारे ज्ञान चिरकाल टिकणारे     असते हे मी स्वानुभवाने सांगत आहे.  

      


3 comments:

  1. तंत्रस्नेही प्रशिक्षणाचा फायदा झाला भाऊ.....छान.!

    ReplyDelete
  2. प्रफुल भाऊ तंत्रस्नेही प्रशिक्षणा फायदा झाला तरी सुद्धा आपणा कडुन बरीचशी माहितीचे मदत घ्यावी लागेल आपल्या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. प्रफुल भाऊ तंत्रस्नेही प्रशिक्षणा फायदा झाला तरी सुद्धा आपणा कडुन बरीचशी माहितीचे मदत घ्यावी लागेल आपल्या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा

    ReplyDelete