उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Tuesday 1 March 2016





 जिल्हा परिषद शाळा करजगाव पं.स. तिवसा येथील शाळेत रचनावादी पद्धतीने शिकतांना विद्यार्थी
कार्डबोर्डचे लहान लहान तुकडे करुन त्यावर इंग्रजी वर्णाक्षरे काढून विद्यार्थ्यासमोर ठेवावीत. योग्य त्या वर्णाक्षरांचा क्रम लावून विद्यार्थी शब्द तयार करतात.








1 comment: