उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Monday 25 April 2016

जाणून घ्या बालभारती च्या QR कोडेड टेक्ट बुक्स विषयी





विश्व QR कोडेड बुक्सचे


⭕ सर्व प्रथम हे QR कोड म्हणजे काय ते पाहू

QR कोड म्हणजे Quick Responce Code

हे कोड जलद व तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ओळखले जातात.

⭕  QR कोड चा शिक्षण क्षेत्रात वापर करण्यामागे हेतू काय ?

ग्रामीण व् शहरी भागातील अंकीय दरी (Digital Divide) कमी करण्याच्या हेतूने QR कोड चा शिक्षण क्षेत्रात वापर केला जाणार आहे.
आज ग्रामीण भागात मोबाईल चा वापर वाढत आहे.
TRAI च्या जून 2015 च्या अहवालानुसार सन 2019 मधे भारताच्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक मोबाईल धारक असतील।
भविष्यातील ही तांत्रिक उपलब्धता लक्षात घेता अशी तांत्रिक दृष्टया सक्षम पुस्तके तैयार करणे व् ती सर्वापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे।


⭕ बालभारती च्या पुस्तकात QR कोड मधे काय काय असेल?


सध्या ट्रेनिंग साठी उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकात हे कोड दिले आहेत. हे कोड केवळ मराठी माध्यामाच्या पुस्तकातअसून प्रायोगिक स्वरूपात सर्व पुस्तकात 3 कोड छापले असून इंग्रजी च्या पुस्तकात 5 कोड छापले आहेत.

आता या कोड मधे केवळ पुस्तके पीडीएफ स्वरूपात देण्यात आलेली आहेत.

जून मधे जेंव्हा ही पुस्तके मुलां पर्यन्त पोहचतील तेंव्हा पर्यन्त या कोड मधील डाटा बदलून त्या त्या पानाशी संबंधित ईलर्निंग मटेरियल असेल.
यात कवितेच्या ऑडियो फॉर्मेट

पाठाशी संबंधित व्हिडीओ ऑनलाइन प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न आहे.


⭕ हे Qr कोड कसे वापरावे?

स्मार्ट फोन मधील NEO ReADER सारख्या app मधून हे कोड स्कॅन केले की त्या कोड मधील डिजिटल आशय मोबाईल वर प्राप्त होईल.
टेक सर्व्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून हे कोड कसे वापरावे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

पाठ्यपुस्तकांना तांत्रिक दृष्टया सक्षम करून पाठय पुस्तकातील आशय डिजिटल माध्यमातून जिवंत करण्याचा हां भारत देशातील पहिलाच प्रयोग बालभारती ने स्विकारला याचा आनंद आहे.
या वर्षी हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे. यात शक्यतो काही अड़चण येणार नाही.
पण काही तांत्रिक समस्या आलीच तर नक्की सांगावी.

या प्रयोगाबाबत आपल्या सहकारी शिक्षकाना ,सर्व मुलांना ,पालकांना आवर्जून सांगा.

                                                           


No comments:

Post a Comment