आयकर परतावा (रिर्टन) 2018-19
|
2018-19 या आकारणी वर्षासाठी इनकम टॅक्स रिर्टन भरणे सुरु झाले आहे. आपण सुध्दा आपला रिर्टन फाईल केला असेलच..........
💰 इनकम टॅक्स रिटर्न 2018-19 💰
अतिमहत्त्वाचे ➡
➡ आपण A. Y. 2018-19 साठी ऑनलाईन रिटर्न फाईल केला असेलच जर केला नसेल तर 31 ऑगस्ट पूर्वी तो फाईल करा.
➡ रिटर्न फाईल केल्या नंतर हा रिटर्न व्हेरिफाय करावा, व्हेरिफाय जर केला नाही तर फाईल केलेल्या रिटर्नला काहीच किंमत उरत नाही.
➡ रिटर्न व्हेरिफाय करण्याच्या पाच पध्दती आहेत त्यापैकी तुम्हाला सोयीस्कर जी पद्धत असेल ती निवडा.
➡ रिटर्न व्हेरिफाय केल्यानंतर सदर रिटर्न प्रोसेसिंग विभागात जातो व तेथे आपण ऑनलाईन सादर केलेल्या रिटर्नची तपासणी होते.
नंतर
यात काही त्रुटी असेल तर आपल्याला खालील कलमा अंतर्गत नोटीस येते.
1) कलम 143(1) यात आपण क्लेम केलेली टॅक्सची अमाऊंट आणि आपल्या ऑफिसने आपल्या पॅनवर जमा केलेली टॅक्सची अमाऊंट यात फरक असेल तर ही नोटीस येते. आता आपण एक उदाहरण पाहू.... समजा मला एकूण 10000 रुपये टॅक्स पडला आणि हा टॅक्स मी माझ्या वेतनातून कपात करून दिला. परंतु माझ्या कार्यालयाने माझ्या पॅनवर फक्त 9000 रुपयेचं जमा केला. आता मी जर 10000 रकमेवर रिटर्न फाईल केला असेल (जो करायलाच पाहिजे होता) तर मला 1000 रुपयासाठी डिमांड नोटीस येईल. *या नोटीसचे उत्तर 30 दिवसात देणे अपेक्षित असते आपण जर ते दिले नाही तर 1000 रूपये आपले outstanding tax demand मध्ये show होते आणि मग यावर दरवर्षी व्याज वाढत जाते.*
📌 आपण क्लेम केलेला टॅक्स आणि ऑफिसने जमा केलेला टॅक्स जर सारखाच असेल.....तरीसुद्धा 143(1) या कलम अंतर्गत नोटीस आली असेल तर घाबरायचे काहीच कारण नाही ही नोटीस फक्त तुमच्या माहितीसाठी आहे हे लक्षात असू द्या.
➡ कलम 143(1)(a) या नुसार जर नोटीस आली असेल तर....
आपला टॅक्स हा पाहिजे त्यापेक्षा जास्त कपात झाला म्हणून आपण जास्त कपात झालेली रक्कम परत मिळावी म्हणून रिटर्न फाईल करतो त्यावेळी ही नोटीस येते. पूर्वी अशी नोटीस येत नव्हती परंतु मागील वर्षी आयकर विभागाला फसवून बऱ्याच महाभागांनी रिटर्न मिळत नसतांना सुद्धा तो परत मिळवला आहे ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्यामुळे आता आपल्याला रिटर्न परत मिळवतेवेळी काही पुरावे सादर करावे लागतात.
उदाहरणार्थ
मला यावर्षी टॅक्स 10000 रुपये पडला परंतु माझ्या वेतनातून 15000 रुपये कपात झाले असेल तर मी माझे 5000 रुपये परत मिळविण्यासाठी रिटर्न फाईल केला परंतु मला 143(1)(a) ने नोटीस आली असेल तर मी काय करावे? अशावेळी आपण इनकम टॅक्स वेबसाईटवर लॉगइन करावे. तेथे जो e-procesing टॅब आहे त्याला क्लीक करावे. एक विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला काही माहिती विचारल्या जाईल ती भरावी. जर काही पुरावे मागितले असेल तर ते अपलोड करावे. तेव्हाच आपल्याला आपली रक्कम परत मिळेल जर नोटीस आली असेल तर. |
मुख्यपान
- मुख्यपान
- फोटो गॅलरी
- डाऊनलोड
- अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा
- Income Tax Return
- विद्यार्थ्यांची वर्ष निहाय्य माहिती
- आकर्षक मराठी फॉन्ट
- महत्वाचे अप्लिकेशन
- Student Transfer
- वर्गवार व जातवार पटसंख्या 16-17
- मुलींचा उपस्थिती भत्ता
- विविध शालेय समित्या
- वेतनवाढ व वेतन गणकयंत्र
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2016-17
- महत्वाचे शासन निर्णय
- विद्यार्थ्यांचा निकाल 2016-17
- विद्यार्थ्यांकरिता योजना
- Income Tax Calculator 2018-19
- संकलित मूल्यमापन २ चाचणी २०१७-१८
Sunday, 12 August 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment